India vs Sri Lanka, Toss Update :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून नाणेफेक नुकतीच पार पडली आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचं पुनरागमन झालं असून रोहित, विराट, केएल राहुलसह श्रेयस अय्यर मोहम्मद शमी हे देखील मैदानात उतरणार आहेत.






कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,म युजवेंद्र चहल


कसा आहे श्रीलंकेचा संघ?


पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका


भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head 


भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 162 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 93 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांचा विचार करता भारतीय संघाचा दबदबा श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यांमध्ये असल्याचं दिसून येत आहे.


हे देखील वाचा-