India beats South Africa: भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्याकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पुनरागमनाची संधी मिळालेल्या भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक चाहरच्या (Deepak Chahar) भेदक गोलंदाजीमुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 106 रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. हर्षल पटेलनंही या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.


भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यातील 10 मुद्दे-


- या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलं.


- दीपक चाहर आणि अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ डगमगताना दिसला. अवघ्या 15 चेंडूत आणि 9 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी परतला. 


- एडन मार्कराम आणि केशव महाराजनं संघाचा डाव पुढं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु,आठव्या षटकात हर्षल पटेलनं मार्करामच्या रुपात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहावा धक्का दिला.


- दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून भारतासमोर 20 षटकात 107 धावांचं लक्ष्य ठेवलं.


- भारताकडून अर्शदीप सिंहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दीपक चाहर आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, अक्षर पटेलनं एक विकेट्स घेतली.


- दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा छमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.


- भारताची धावसंख्या 9 धावांवर असताना कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. भारताच्या डावातील सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराट कोहली (9 चेंडूत 3 धावा) नॉर्खियाच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. 


- नंतर केएल राहुल (नाबाद 51 धावा) आणि सूर्यकुमार यादवनं (नाबाद 50 धावा) भारतीय संघाच्या विजयाचा विडा उचलला.


- या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 8 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.


- दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि अनरिच नॉर्खिया यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हे देखील वाचा-