Deepak Chahar Jaya Bhardwaj Wedding : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर लग्नाच्या बंधनात अडकलाय. आग्र्यामध्ये दीपक चाहरने पाहुण्यांच्या उपस्थितीत जया भारद्वाजसोबत लग्न केलेय. दीपक चाहरच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंगळवारी दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांचा हळदी समारंभ पार पडला होता. दीपक चाहरच्या लग्नाला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. 






स्टेडिअममध्ये केले होते प्रपोज - 
गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. सात ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. सामना संपल्यानंतर दीपक चाहरने स्टेडिअममध्येच प्रेयसी जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते.  दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. 


कोण आहे जया भारद्वाज?
दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 (वर्ष-2011) मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ MTV चा प्रसिद्ध शो स्पिल्ट्स विला सह इतर अनेक शोमध्ये दिसलाय. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता. तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.