IND vs SA T20 Series: आयपीएलच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौरात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचणार आहे. भारतीय संघानं आतापर्यंत सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. जर टीम इंडियानं पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर हा संघाचा सलग 13वा विजय असेल. यासह भारत इतिहासात सलग सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम करेल.
कोणाचं पारडं जंड?
भारताविरुद्ध टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड राहिलंय. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानंही कधीही टी-20 मालिका गमावली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन वेळा भारत दौऱ्यावर आला होता. मात्र, दोन्ही वेळी भारताच्या पदरात निराशा पडली. आता दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच देशांतर्गत टी-20 मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिकेचा दौरा
दरम्यान, 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 च्या फरकानं मालिका जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा 2019 मध्ये भारतात आला. ही मालिका एक-एक बरोबरीनं सुटली.
भारतीय टी20 संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.
हे देखील वाचा-
- Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं निवडली आयपीएल 2022 बेस्ट इलेव्हन, रोहित- विराटला संघात स्थान नाही!
- French Open 2022: 'पीरियड्सनं हरवलं' पराभवानंतर चीनी खेळाडूला अश्रुंचा बांध फुटला
- Ind Vs Sa T20 Series: आयपीएल संपली, आता आंतरराष्ट्रीय ऍक्शन सुरू! दक्षिण आफ्रिकेचा संघ 'या' दिवशी दिल्लीला पोहोचणार