Sachin Tendulkar's IPL 2022 XI: इंडियन प्रीमियर लीगचा पंधरा हंगाम संपला आहे आणि आता या हंगामाचं विश्लेषण सुरू आहे. आयपीएल 2022 मध्ये अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रभावित केलं आहे. तर, काही टॉपच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळं टीकेची धनी ठरले आहेत. दरम्यान, अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपली आयपीएल बेस्ट इलेव्हन संघाची निवड करताना दिसत आहे. वसीम जाफर, किविन पीटरसन यांच्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही (Sachin Tendulkar) त्याची आयपीएल बेस्ट इलेव्हन निवडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सचिनच्या या संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या (MS Dhoni) दिग्गजांची नावे नाहीत.


जोस बटलर- शिखर धवनकडं सलामीची जबाबदारी
सचिन तेंडुलकरनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर आयपीएल 2022 च्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगितलंय. सचिन तेंडुलकर यांनी निवडलेल्या संघात शिखर धवन आणि जोस बटलर सलामी देणार. यंदाच्या हंगामात जोस बटलरनं दमदार कामगिर करून दाखवली आहे. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा जोस बटलर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. तर, शिखर धवननंही पंजाबकडून खेळताना चांगली कमगिरी करून दाखवली आहे. 


मधल्या फळीत कोण?
तिसऱ्या क्रमांकावर लखनौचा कर्णधार केएल राहुलची निवड केली आहे. त्यानं या हंगामात सातत्यानं धावा केल्या आहेत. त्यानंतर गुजरातचा कर्णधार गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. 


कोणकोणत्या गोलंदाजांना मिळाली संधी?
सचिनच्या आयपीएल 2022 बेस्ट इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्याला त्याच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्याच्यानंतर डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक यांचा क्रमांक लागतो. गोलंदाजीमध्ये सचिन तेंडुलकरनं राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांची निवड केली आहे. 


सचिन तेंडुलकर आयपीएल 2022 बेस्ट इलेव्हन:
शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.


हे देखील वाचा-