Kane Williamson Ruled Out Of Second Test: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला (ENG vs NZ) आणखी एक धक्का देणारी माहिती समोर आलीय. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याला दुजोरा दिला आहे. केन विल्यमसनच्या जागी हमिश रदरफोर्डचा संघात समावेश करण्यात आलाय. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचं नेतृत्व करेल.


न्यूझीलंडचा संघ 0-1 नं पिछाडीवर
न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्स कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर न्यूझीलंडचा संघ 0-1 नं पिछाडीवर आहे. त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून म्हणजेच 10 जूनपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी केन विल्यमसनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. 


ट्वीट- 



गॅरी स्टेड काय म्हणाले?
"एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसनला कोरोनामुळं बाहेर पडावं लागलं आहे. या क्षणी तो किती निराश असेल हे आम्हा सर्वांना माहिती आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर केन विल्यमसन आता नियमानुसार  दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. हमिश व्हिटॅलिटी टी20 ब्लास्टमध्ये लीसेस्टरशायर फॉक्सकडून खेळत होता. आता तो संघात परतणार आहे."


दरम्यान, पहिल्या कसोटी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या कसोटी सामना जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. तर, नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. यामुळं इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा-