IPL 2022: आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा आगामी टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून निवड समिती या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.आयपीएल 2022 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आणि लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) यांच्या नावाचा समावेश आहे. 

उमरान मलिक-
उमरान मलिकनं यंदाच्या हंगामात त्याच्या वेगानं संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं या हंगामात 150 प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेक भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला भारतीय संघात स्थान मिळावं,याची मागणी केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.  

मोहसीन खान - 
लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्यानं सहा सामने खेळले आहेत. ज्यात 10.90 च्या सरासरीनं आणि 5.19 इकोनॉमी रेटनं 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची या हंगामातील 16/4 ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत दौरा
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

क्रमांक

 

 

दिवस

तारीख

सामना

ठिकाण

1

गुरुवार

9 जून

1st T20I

दिल्ली

2

रविवार

12 जून

2nd T20I

कटक

3

मंगळवार

14 जून

3rd T20I

वायजाग

4

शुक्रवार

17 जून

4th T20I

राजकोट

5

रविवार

19 जून

5th T20I

बेंगलरु

हे देखील वाचा-