India vs South africa Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यतील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज पार पडणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 2-2 सामने जिंकल्याने बरोबरीत आहेत. त्यामुळे आज सामना जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे. त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा सामना असून या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करतील. दरम्यान आज पार पडणाऱ्या सामन्यांत अंतिम 11 मध्ये शक्यतो भारत कोणताही बदल करणार नाही. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 19 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 18 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी 11 सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, तीन सामने गमावले आहेत. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता मात्र मालिकेत दोन्ही संघानी 2-2 सामने जिंकले असून आज पाचवा आणि अंतिम सामना पार पडणार आहे.
हे देखील वाचा-
- Dinesh karthik : दिनेशच्या तुफान फॉर्ममागचं नक्की कारण काय? कार्तिकने स्वत:च केला उलगडा
- IND vs SA: 'पंतला शोधण्यात आपण कार्तिक आणि सॅमसनला गमावलं', खराब फॉर्मनंतर ट्रोल होतोय ऋषभ पंत
- Hardik on MS Dhoni : 'स्वत:च्या नाही, तर संघाच्या धावसंख्येचा विचार कर', धोनीचा सल्ला हार्दिकसाठी ठरला मौल्यवान