Ind vs SA, 1 Innings Highlights Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु असून भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब प्रदर्शन दाखवलं आहे. कर्णधार कोहलीच्या 79 आणि पुजाराच्या 47 धावा सोडता इतर फलंदाज काहीच खास कामगिरी करु शकलेले नाहीत. दरम्यान किंग कोहलीचं शतक पुन्हा एकदा हुकल्याने भारतीय चाहते निराश झाले असून आता सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
आफ्रिकेच्या केपटाउन येथे सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.
भारताला इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही
हे देखील वाचा-
- Washington Sundar Covid Positive: युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
- Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार? धाा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha