Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिसने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. मॉरिसनं सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. क्रिस मॉरिस यापुढे देशांतर्गत संघ टायटन्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्यानं सांगितलंय. क्रिस मॉरिसनं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.


नुकतीच क्रिस मॉरिसनं त्याच्या इंन्स्टाग्रामवरून एक पोस्ट केलीय. ज्यात त्यानं असं म्हटलंय की, "आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे! माझ्या प्रवासात ज्या लोकांचा सहभाग होता, मी त्यांचं आभार मानतो. मग तो व्यक्ती लहान किंवा मोठा असो. हा प्रवास खूप मजेदार होता, असं क्रिस मॉरिसनं म्हटलंय. तसेच देशांतर्गत क्रिकेट संघ टायटन्सनं त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानं त्यानं आनंद व्यक्त केलाय.


क्रिस मॉरिसची इन्स्टाग्राम पोस्ट-






 


क्रिस मॉरिसची कारकिर्द-
34 वर्षीय मॉरिसनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. मॉरिसनं 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 विकेट्स आणि 467 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्यानं 23 सामन्यात 34 विकेट्ससह 133 धावा केल्या आहेत. तर, मॉरिसनं जगभरातील विविध लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 234 सामन्यांमध्ये 290 विकेट्ससह 1 हजार 868 धावा केल्या आहेत. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha