IND vs SA, 3rd T20 Live: दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी; भारताचा 48 धावांनी विजय

IND vs SA, 3rd T20, ACA-VDCA Stadium: : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात भारत पराभूत झाला आहे. ज्यानंतर आज तिसरा सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jun 2022 10:24 PM
IND vs SA, 3rd T20 Live: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय

महत्त्वाच्या सामन्यात कमाल खेळ करत भारताने 48 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचं मालिकेतील आव्हान जिंवत राहिलं आहे.

IND vs SA, 3rd T20 Live: भारताच्या भेदक मारा सुरुच, दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

हर्षल पटेलने आणखी एक विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचे एकूण 5 गडी तंबूत धाडले आहेत.

IND vs SA, 3rd T20 Live: चहलने मिळवली आणखी एक विकेट, द.आफ्रिकेचा चौथा गडी बाद

ड्वेन प्रिटोरीस याला चहलने 20 धावांवर तंबूत धाडलं आहे.

IND vs SA, 3rd T20 Live : भारताची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी तंबूत

भारताने गोलंदाजीत चांगली सुरुवात करत तीन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तंबूत धाडलं आहे. यावेळी हर्षल पटेल, चहल आणि अक्षर यांनी एक-एक विकेट घेतली आहे.

IND vs SA, 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानात

180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि रीझा हेंड्रिक्स मैदानात आले आहेत.

IND vs SA, T20 Live : दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे आव्हान

ईशान आणि ऋतुराजच्या अर्धशतकांच्या मदतीने भारताने 179 धावांपर्यंत मजल मारल्याने  दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे आव्हान आहे.

IND vs SA, T20 Live : अर्धशतक झळकावून ऋतुराज बाद

57 धावा करुन ऋतुराज गायकवाड बाद झाला आहे. केशव महाराजने त्याला बाद केलं आहे.

IND vs SA. T20 Live : ऋतुराजचं गायकवाडचं अर्धशतक पूर्ण

मागील दोनही सामने खराब प्रदर्शन केलेल्या ऋतुराजची बॅट आज मात्र तळपली आहे.  त्याने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

IND vs SA, T20 Live : भारताची दमदार सुरुवात

भारताचे युवा सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सुरुवात संघाला करुन दिली आहे. त्यामुळे भारताने 6 षटकानंतर 57 धावांपर्यंत एकही विकेट न गमावता मजल मारली आहे.

IND vs SA, T20 Live : कशी आहे दक्षिण आफ्रिकेची अंतिम 11

टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 

IND vs SA, T20 Live : कशी आहे भारताची अंतिम 11

ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.


 

IND vs SA, T20 Live : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक पार पडली असन दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी निवडली आहे.

IND vs SA, T20 Live : कशी आहे मैदानाची स्थिती?

डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमरील खेळपट्टी गोलंदाजासाठी अधिक चांगली आहे. याआधीही याठिकाणी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे फलंदाजांना रिस्क अधिक असल्याने सांभाळून खेळावं लागेल. यावेळी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने सामना संपूर्ण षटकांचा होईल. त्यात समुद्रकिनारा जवळ असल्याने हवा अधिक असल्यास गोलंदाजांना अधिक मदत होईल.

IND vs SA, T20 Live : दक्षिण आफ्रिका संभाव्य अंतिम 11

टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 

IND vs SA, T20 Live : भारतीय संघाचे संभाव्य अंतिम 11

ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल,उमरान मलिक.

IND vs SA, T20 Live : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी20 काही वेळातच

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.

पार्श्वभूमी

IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत आज विजय मिळवून मालिकेती आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघाना आज विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.


त्यात सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली असल्याने एक छोट्या धावसंख्येची मॅत आज पाहता येऊ शकते. कारण या मैदानावर सर्वाधिक स्कोर 127 आणि सर्वात कमी 82 रन इतका आहे. त्यामुळे आज नेमकी किती धावसंख्या होईल हे पाहणे औत्सक्याचे असेल. याआधीही याठिकाणी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे फलंदाजांना रिस्क अधिक असल्याने सांभाळून खेळावं लागेल. यावेळी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने सामना संपूर्ण षटकांचा होईल. त्यात समुद्रकिनारा जवळ असल्याने हवा अधिक असल्यास गोलंदाजांना अधिक मदत होईल.


दोन्ही संघाची अंतिम 11


भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.


दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.