IND vs SA 3rd T20 Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आहे.  विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात खेळवला जाणाऱ्या या सामन्यात भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यावेळी भारताचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी दमदार अर्धशतकं झळकावली आहेत.  



सामन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. आजच्या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्याने दक्षिण आफ्रिकेने हा निर्णय़ घेतला आहे. सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली आहे. या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आफ्रिकेने हा निर्णय घेतला. दरम्यान आधीच दोन सामने गमावलेल्या भारताला आज चांगली धावसंख्या गाठता येईल असे वाटत नव्हते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांच्या फलंदाजीने हे चित्रच पलटले. ऋतुराजने 35 चेंडूत 57 तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. याशिवाय हार्दिकनेही महत्त्वपूर्ण अशा 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.


दोन्ही संघाची अंतिम 11


भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.


दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 


हे देखील वाचा-