IND vs SA 3rd T20 Live : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत नुकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. आजच्या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्याने दक्षिण आफ्रिकेने हा निर्णय़ घेतला आहे.
विशेष म्हणजे दोन्ही संघानी आजही अंतिम 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहुया...
दोन्ही संघाची अंतिम 11
भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया.
गोलंदाजांकडे लक्ष
सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली असल्याने नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेणार होता हे जवळपास निश्चित होतं. कारण या मैदानावर सर्वाधिक स्कोर 127 आणि सर्वात कमी 82 रन इतका आहे. याआधीही याठिकाणी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे फलंदाजांना रिस्क अधिक असल्याने सांभाळून खेळावं लागेल. यावेळी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SA, 3rd T20: तिसऱ्या टी-20 मध्ये विश्वविक्रमासाठी मैदानात उतरणार भुवनेश्वर कुमार, एक विकेट घेऊन रचणार इतिहास
- Asian Cup 2023: सलग दुसऱ्यांदा भारतीय फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र
- IND vs SA 3rd T20: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज काटे की टक्कर, पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचं लक्ष!