IND vs SA 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज विशाखापट्टणम येथे तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं पहिले दोन सामने गमावल्यामुळं आजचा सामना भारतासाठी 'करो या मरो' चा असणार आहे. या मालिकेत भारत 2-0 नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकायचा आहे. तर, या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारताचे युवा गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) किंवा अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांपैकी एकाला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra)  यांनी आजच्या सामन्यात उमरान आणि अर्शदीपपैकी कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे, यावर भाष्य केलंय.


आकाश चोप्रा काय म्हणाला?
आकाश चोप्रा आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हणाले की, "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात उमरान मलिकला पदार्पणाची संधी मिळू शकते. संघात जर कोणता बदल करायचा असेल तर, मी अर्शदीपचं नाव घेईल. परंतु, आयपीएलच्या मधल्या षटकात उमरान मलिकनं उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. यामुळं मधल्या षटकातील समस्या दूर करण्यासाठी उमरानला संधी मिळायला हवी. जेव्हा अक्षर पटेलवर दबाव असतो, तेव्हा संघ वेगवेगळ्या कॉम्बिनेशनसह जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आज उमरान खेळणे शक्य आहे."


अक्षर पटेल ऐवजी रवि बिश्नोईला संधी देण्याची गरज
भारत- दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलच्या जागी रवी बिश्नोई संधी देण्यात यावी, असं आकाश चोप्रानं म्हटलंय. आकाश चोप्रा म्हणाला की, 'अक्षरच्या जागी रवी बिश्नोईचा समावेश करावा असे मी म्हणेन. कारण, या मैदानावर लेग स्पिनरची आकडेवारी चांगली आहे. या मैदानावर लेग स्पिनरना सर्वाधिक विकेट्स मिळतात.


हे देखील वाचा-