IND vs SA 3rd T20 Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात 48 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. आतापर्यंत भारताने दोन सामने गमावल्याने आज पराभूत झाल्यास मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने विजयी आघाडी घेतली असती. पण भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs SA 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. कारण आज सामना होणाऱ्या मैदानावर प्रथम गोलंदाजी घेणारा संघच जिंकला होता. पण आज मात्र दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांनी घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चुकला.

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज भारताच्या फलंदाजांसह गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत 48 धावांनी सामना जिंकून दिला. यावेळी फलंदाजीत ईशान-ऋतुराज तर गोलंदाजी हर्षल, चहल यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 

  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली.

  4. दोन्ही सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केली. यावेळी ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. 

  5. याशिवाय हार्दिकनेही महत्त्वपूर्ण अशा 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले.

  6. 180 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब झाली.

  7. अक्षर पटेल, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या वाढवू दिली नाहीच उलट एका मागोमाग एक गडी देखील बाद केले.

  8. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरीज क्लासेन याने सर्वाधिक 29 धावा केल्या.

  9. तर भारताकडून आयपीएल गाजवणाऱ्या हर्षलने 4 तर चहलने 3 गडी बाद केले. याशिवाय अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही एक-एक विकेट घेतली.

  10. सामन्यात युजवेंद्र चहलने 4 षटकात 20 धावा देत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


हे देखील वाचा-