Ind vs SA, 1st Innings Highlights: केपटाऊनच्या Newlands मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना सुरु आहे. पहिले दोन सामने गमावून भारताने मालिकाही गमावली आहे. पण किमान शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. भारताची चांगली सुरुवात होऊनही डी कॉक आणि ड्युसेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरत 287 धावा स्कोरबोर्डवर लावत भारतासमोर 288 धावांचे आव्हान ठेवले आहे. 



सामन्यात भारताने उत्तम गोलंदाजीने खेळाची सुरुवात केली. आफ्रिकेचे मलान, बावुमा आणि मार्करम हे खेळाडू स्वस्तात माघारी परतले. पण डी कॉक आणि ड्युसेन यांनी डाव सावरला. डी कॉकने 124 धावा करत शतक झळकावलं. तर ड्युसेनने अर्धशतक झळकावत 52 धावा केल्या. त्यानंतर मिलरनेही 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 3, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली आहे.


चार बदलांसह टीम इंडिया मैदानात


तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने अंतिम 11 मध्ये चार बदल केले आहेत. यात सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चाहर यांना संधी मिळाली आहे. तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, व्यंकटेश अय्यर आणि आर. आश्विन यांना विश्रांती दिली आहे.


भारत अंतिम 11 - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha