Ind vs SA Second Test Match Weather : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) मध्ये कसोटी मालिकेतील (Test Series) दुसरा कसोटी सामना सोमवारपासून जोहान्सबर्ग (Johannesburg) च्या वांडरर्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया (Team India) 1-0 नं पुढे आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया सेंच्युरियन (Centurion) मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला होता. सध्या टीम इंडियाची नजर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यावर आहे. टीम इंडियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. 


दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाचा अंदाज चांगला नाही. Weather.com नुसार, सोमवारी दुपारी जोहान्सबर्गमध्ये पावसाची 50 टक्के शक्यता आहे. येथील तापमान 14 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.



भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. सामन्यात भारताकडून केएल राहुलचं शतक आणि मोहम्मद शमीच्या 8 विकेट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरा सामना सोमवारी (3 जानेवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.


भारताला इतिहास रचण्याची संधी 


भारतीय क्रिकेट संघाने 90 च्या दशकात पहिली कसोटी मॅच दक्षिण आफ्रिकेत खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी मालिका आफ्रिकेत जिंकलेली नाही. पण सोमवारी सुरु होणारी कसोटी मॅच भारताने जिंकल्यास भारत तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घालून इतिहास रचेल.


अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन : 


विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव