Ind vs SA 2nd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (Ind vs SA 2nd T20) सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्या टी-20 मध्ये भारतीय संघाने (Team India) विजय मिळवला होता. त्यानंतर काल झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. (Ind vs SA 2nd T20)

Continues below advertisement

नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना 213 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताने सर्व विकेट्स गमावत फक्त 162 धावा केल्या. यामुळे भारताचा 51 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डीकॉकने 46 चेंडूत 90 धावा केल्या. क्विंटन डीकॉकने (Quinton de Kock) टीम इंडियाच्या सर्व गोलंदाजांना धू धू धुतलं. सामन्याचा सामनावीर म्हणून क्विंटन डीकॉकची निवड करण्यात आली. दरम्यान, क्विंटन डीकॉक आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या षटक संपताच क्विंटन डीकॉकची मस्ती करत नको तिकडे हात लावल्याचे दिसून येत आहे. (Quinton de Kock And Hardik Pandya)

सामना कसा राहिला? (Ind vs SA 2nd T20)

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, त्याचा निर्णय योग्य ठरला नाही आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 213 धावा केल्या. डीकॉक व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी केली नसली तरी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खेळाडूने वेगवान फलंदाजी केली. डीकॉकने कर्णधार एडेन मार्करामसोबत या सामन्यात सर्वात मोठी भागीदारी केली, दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला फक्त 162 धावा करता आल्या आणि 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी खूपच निराशाजनक होती. या सामन्यात टॉप ऑर्डरला काही खास करता आले नाही. शुभमन गिल खाते न उघडताच बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्मा देखील 17 धावा काढून बाद झाला. बऱ्याच काळापासून अपयशी ठरलेला कर्णधार सूर्यकुमार यादव देखील या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही. सूर्यकुमार 5 धावा काढून बाद झाला.

संबंधित बातमी:

Shubman Gill Ind vs SA 2nd T20 : आता बस्स झालं! शुभमन गिलचे खूप लाड पुरवले; संजू सॅमसनला संधी कधी?, क्रिकेट चाहते संतापले