India vs South Africa 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना डर्बनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने युवा आणि अनुभवी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. नाणेफेकीच्या वेळी तो म्हणाला की, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. विकेट चांगली दिसते. 






दरम्यान, सूर्या दादाच्या भीतीमुळे पॅट्रिक क्रुगरने एकाच षटकात 11 चेंडूत टाकल्या, आश्चर्यकारक म्हणजे त्याने फक्त 15 धावा दिल्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादवची शिकार केली. भारताला दुसरा धक्का सूर्यकुमार यादवच्या रूपाने बसला. 17 चेंडूत 21 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान, त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले. 






सूर्यकुमार यादवने केला अनोखा पराक्रम


भारतासाठी सूर्यकुमार यादवचा हा 75 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह त्याने भारतासाठी सर्वाधिक T20I सामने खेळण्याच्या बाबतीत रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. जडेजाने भारतासाठी 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने T20I मधूनही निवृत्ती घेतली आहे. सध्या हे 8 खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, सुरेश रैना, ऋषभ पंत हे भारतासाठी T20I सामने खेळण्याच्या बाबतीत सूर्यकुमारच्या पुढे आहेत. 






दोन्ही संघांचे प्लेइंग-11


भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.


दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.


हे ही वाचा -


S Africa vs Ind 1st T20I : द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूंना दिली संधी, जाणून घ्या प्लेइंग-11