एक्स्प्लोर

विराटचं शतक, सिराजच्या तीन विकेट, भारत-पाक सामना सुरु होण्याआधीच निकाल ? स्कोअरबोर्ड व्हायरल

IND vs PAk : चौका चौकात, नाक्यावर, कट्ट्यावर याचीच चर्चा सुरु आहे. पण हा सामना सुरु होण्याआधीच सोशल मीडियावर स्कोअरबोर्ड व्हायरल झाला आहे. 

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज अहमदाबादच्या (Narendra Modi Stadium) मैदानात महामुकाबला होणार आहे. World Cup 2023 मधील या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आजच्या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत आजी-माजी खेळाडू अंदाज व्यक्त करत आहेत. चौका चौकात, नाक्यावर, कट्ट्यावर याचीच चर्चा सुरु आहे. पण हा सामना सुरु होण्याआधीच सोशल मीडियावर स्कोअरबोर्ड व्हायरल झाला आहे. 

सामन्याचा निकाल सांगणाऱ्या या स्कोअरबोर्डची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ जिंकेल. विराट कोहली वादळी शतक ठोकून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावेल, त्याशिवाय गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज भेदक मारा करेल, असं व्हायरल होणाऱ्या स्कोअरबोर्डवरील आकडे सांगतात.

व्हायरल स्कोअरबोर्डचा फोटो हा विकिपीडियारील असल्याचे दिसत आहे. त्यात सामन्याचा निकाल दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास निमंत्रित करेल. भारतीय संघ 50 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 334 धावांचा डोंगर उभारेल. त्यात विराट कोहलीचं महत्त्वाचं योगदान असेल. कोहली 83 चेंडूंमध्ये नाबाद 119 धावांची खेळी साकारेल. पाकिस्तानाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या सामन्यात 10 षटकांत 84  धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना बाद करेल, असे व्हायरल होणाऱ्या स्कोअरबोर्डवर दिसत आहे. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव फक्त 237 धावांमध्ये आटोपला जाईल. यामध्ये मोहम्मद रिजवान 54 धावांची खेळी करेल. तर भारताकडून मोहम्मद सिराज 10 षठकात 36 धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेईल. भारतीय संघ पाकिस्तानचा 97 धावांनी पराभव करेल, असे व्हायरल होणाऱ्या स्कोअरबोर्डवर दिसत आहे. 

सोशल मीडियावर हा स्कोअरबोर्ड वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर (Narendra Modi Stadium) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आमना सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता या महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे (Team India) पारडे जड मानले जात आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Team India Injury Crisis : टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
IND vs SL : 368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
Hardik Pandya IPL Trade 2027 : हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...
हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget