IND vs PAK, World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या मैदानात महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या मैदानात लाखभर चाहते जमले आहेत. त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या हायव्होल्टेज सामन्यात विराट कोहलीकडून एक चूक झाली आहे. विराट कोहली पाकिस्तानविरोधात चुकीची जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्याला आपली गफलत लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ सुधारणा केली. विराट कोहलीने नंतर जर्सी बदलली. पण तोपर्यंत फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. 


रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ फिल्डिंगसाठी मैदानात उतरला. त्यावेळी विराट कोहलीने चुकीची जर्सी घातलेली निदर्शनास आले. काही षटके झाल्यानंतर विराट कोहलीच्याही हे लक्षात आले. त्याने तात्काळ जर्सी बदलली. विराट कोहलीने घातलेल्या जर्सीच्या खांद्यावर तीन पांढऱ्या रेषा होत्या. भारताच्या सध्याच्या जर्सीवर तिरंग्याच्या रंगाच्या तीन पट्ट्या खांद्यावर आहेत. विराट कोहलीकडून चुकून जुनी जर्सी घातली होती. त्याला हे तात्काळ लक्षात आले. त्याने आपली जर्सी बदलली. 


पाहा व्हायरल होणारा फोटो - 


 






भारतीय संघाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पाकिस्तानचे सलामी फलंदाज अब्दुलाह शफीक आणि इमाम यांनी दमदार सुरुवात केली. बुमराहच्या चेंडूला आदर दिला अन् सिराज याचा चांगलाच समाचार घेतला. दोघांची जोडी जमली असे वाटत असताच सिराजने अब्दुलाह याला तंबूचा रस्ता दाखवला. अब्दुलाह शफीक याने 24 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 20 धावांची खेळी केली. त्यानंतर इमाम याने मोर्चा संभाळला होता. इमाम याने वेगाने धावा करण्यास सुरुवात केली होती. पण हार्दिक पांड्या याने अचूक टप्प्यावर चेंडू टाक इमामला तंबूत धाडले. इमाम याने 38 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. 16 षटकानंतर पाकिस्तान संघाने दोन विकेटच्या मोबद्लयात 84 धावा चोपल्या आहेत. कर्णधार बाबर आझम 19 तर रिजवान 8 धावांवर खेळत आहेत.