IND vs PAK, World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकात भारताने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा पाकिस्तानवरचा हा विजय काही जणांना पचवता आलेला नाही. या सामन्यादरम्यानचे स्टेडिअमधील काही व्हिडीओ (Viral Video ind vs pak) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या गदारोळ माजला आहे. पाकिस्तान खेळाडूंना चांगली वागणूक मिळाली नाही, अशी तक्रारही पीसीबीने आयसीसीकडे केली आहे. आता काँग्रेसच्या एका नेत्यानेही यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. इतकेच नाही, तर पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकावा ( PAK will win this World Cup) असेही म्हटले आहे.  


कांग्रेस नेत्याने पाकिस्तानला केला सपोर्ट ? नेमकं काय  


तमिळनाडू काँग्रेस महासचिव दिव्या मारुंथैया यांनी भाजपचा विरोध करताना पाकिस्तानला सपोर्ट केला आहे. यावरुन सोशल मीडियावर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. दिव्या मारुंथैया यांनी अहमदाबाद येथील मैदानातील भाजपच्या समर्थनाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर भारत इथेच हरला असे लिहिलेय. यावरुन दिव्या मारुंथैया यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले. त्यानंतर त्यांनी त्याच ट्वीटला रिट्वीट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, 'हे लक्षात ठेवा... धार्मिक कट्टरतावाद्यामुळे खऱ्या अर्थाने भारताचा पराभव झाला. मला आशा आहे की, हा विश्वचषक पाकिस्तान जिंकेल...  जय श्री राम....'


पाहा ट्वीट... 






दिव्या मारुंथैया यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. दिव्या मारुंथैया यांना नेटकऱ्यांनी चांगलेच झापल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एक भारतीय नागरिक पाकिस्तानने विश्वचषक जिंकल्याबद्दल बोलत आहे हे  दुःखद आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 


भारताने आठव्यांदा पाकिस्तानला हरवले -


शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 192 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने प्रत्युत्तरदाखल 30.3 षटकात हे आव्हान तीन विकेट गमावून सहज पार केले होते. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली होती. तर गोलंदाजीत बुमराहने भेदक मारा केला होता. 


दरम्यान, 19 ऑक्टोबर रोजी भारताचापुढील सामना पुण्यात होणार आहे. तर पाकिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोरमध्ये होणार आहे.