India vs Pakistan T20 World Cup 2024 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सातवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत खेळवला जात आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर गेली आहे. पूजाच्या जागी सजना सजीवनला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या मोहिमेची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.  






सेमीफायनलच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉसनंतर सांगितले की, पूजा वस्त्राकर जखमी आहे. दुखापतीमुळे ती प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. पूजाच्या जागी सजना सजीवनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सजना ही अष्टपैलू खेळाडू आहे. तिने आतापर्यंत भारतासाठी 9 टी-20 सामने खेळले आहेत.


न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 15 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय संघाचे इतर स्टार फलंदाजही फ्लॉप ठरले. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 102 धावांवर गारद झाला. या सामन्यात पूजा 8 धावा करून बाद झाली. त्याने 7 चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. पूजानेही एक ओव्हर टाकली होती. यामध्ये 9 धावा देण्यात आल्या.


भारत-पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन -


भारत : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.


पाकिस्तान : मुनिबा अली (विकेटकीपर), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (सी), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह, सादिया इक्बाल.


हे ही वाचा -


IPL 2025 : हार्दिक पांड्यासाठी मित्रच ठरला 'व्हिलन'? मुबंईच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं वक्तव्य