Rohit Sharma on Rishabh Pant : बांगलादेशविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीवर आहे. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. रोहित सध्या दुबईत असून त्यातील काही व्हिडिओ आणि फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पण नुकताच रोहित कॉमेडीचा बादशाह मानल्या जाणाऱ्या कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. 2024 टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील काही सदस्यांसह तो कपिलच्या शोमध्ये गेला होता. यादरम्यान त्याने भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला. कपिलने रोहितसह सर्व खेळाडूंसोबत खूप मस्ती केली. दरम्यान, रोहित शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' टी-20 वर्ल्ड कपमधील एक अनोळखी स्टोरी सांगितली. यामध्ये रोहितने पंतबाबत एक मोठा खुलासा केला आहे, जो जाणून तुम्हीही थक्क व्हाल. ही स्टोरी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलशी संबंधित आहे.
रोहित म्हणाला की, एक गोष्ट जी कदाचित कोणालाच माहीत नसेल. दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या त्याआधी थोडा ब्रेक होता. पण खरंतर, ऋषभ पंतच्या मास्टर प्लॅनमुळे खेळ थांबवला होता. गुडघ्याला दुखापत झाल्याचे तो दाखवत होता. त्याला मलमपट्टी केली जात होती, ज्यामुळे खेळ मंदावला कारण खेळ खूप वेगाने चालला होता. त्यावेळी फलंदाजाला गोलंदाजाने पटकन गोलंदाजी करावी असे वाटते. लय कायम ठेवली होती आणि आम्हाला लय तोडायची होती. म्हणून मी फील्ड सेट करत होतो आणि गोलंदाजांशी बोलत होतो, अचानक मला दिसले की पंत खाली बसला आणि फिजिओथेरपिस्ट मैदानावर आले आणि ते पंतच्या गुडघ्याला टेप करत आहे. त्यामुळे खेळ थांबला. क्लासेन सामना पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होता. त्यावेळी पंतसाहेबांनी हुशारी वापरली आणि गोष्टी आमच्या बाजूने गेल्या. असे म्हणत नाही की हे एकमेव कारण आहे, परंतु ते त्यापैकी एक असू शकते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी जूनमध्ये 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना भारताच्या हाताबाहेर गेला होता, पण गोलंदाजांनी असा चमत्कार केला की भारताने केवळ पुनरागमनच केले नाही तर विजेतेपदही पटकावले. ऋषभने या मोठ्या आयसीसी टूर्नामेंटसह क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि चमकदार कामगिरी केली. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पंतने केवळ त्याच्या फलंदाजीनेच नव्हे तर त्याच्या यष्टीरक्षणानेही सर्वांना प्रभावित केले होते, कारण तो भीषण अपघातानंतर बरा झाला होता.
रोहित सोबत शोमध्ये कोण कोण गेले होते?
रोहित शर्मा आणि शिवम दुबे व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह कपिलच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये गेले होते. या सर्व खेळाडूंनी कपिलसोबत खूप विनोद केले आणि मजेशीर किस्से शेअर केले. हा भाग भारताच्या टी-20 वर्ल्ड कप विजयाच्या सेलिब्रेशनचा एक भाग आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्ड कप जिंकला.
हे ही वाचा -
IPL 2025 : हार्दिक पांड्यासाठी मित्रच ठरला 'व्हिलन'? मुबंईच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं वक्तव्य