न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कप 2024(T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आज आमने सामने येत आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच आज रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय टीम आणि बाबर आझमच्या नेतृत्त्वातील पाकिस्तानची टीम आमने सामने येणार आहे. भारतीय टीमचा उपकॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील चांगली कामगिरी करतोय. बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात आणि आयरलँड विरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिकनं दमदार कामगिरी केली होती. आजच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला आणखी एक रेकॉर्ड रचण्याची संधी आहे. हार्दिक पांड्या हा विक्रम रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आजच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला फक्त एक विकेट घेण्याची गरज आहे.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान आमने सामने येत आहेत. या हाय व्होल्टेज लढतीत भारताच्या हार्दिक पांड्याकडे विक्रम रचण्याची संधी आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-20 मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हार्दिक पांड्या स्वत:च्या नावावर करु शकतो.
हार्दिक पांड्यानं आयरलँड विरुद्ध तीन विकेट घेतल्या आहेत. हार्दिकनं चारपैकी एक ओव्हर निर्धाव टाकली होती. हार्दिकनं त्या मॅचमध्ये 27 धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत.
हार्दिक पांड्यानं पाकिस्तान विरुद्ध 6 टी20 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. हार्दिकनं भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि उमर गुलची बरोबरी केली आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमारनं 11 विकेट घेतल्या आहेत.तर, पाकिस्तानच्या उमर गुलनं देखील 11 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्यानं एक विकेट घेतल्यास तो भुवनेश्वर कुमार आणि उमर गुल या दोघांना देखील मागं टाकेल.
हार्दिक पांड्या, उमर गुल, भुवनेश्वर कुमार या तिघांनी प्रत्येकी 11 विकेट घेतल्या आहेत. इरफान पठाणनं 6 आणि अर्शदीप सिंगनं 6 विकेट घेतल्या आहेत.
भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
पाकिस्तानचा संभाव्य संघ :
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ किंवा मोहम्मद आमिर, नसीम शाह, अब्रार अहमद
संबंधित बातम्या :