Asia Cup 2022: येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी आमने सामने येणार आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. पण विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. कोहली हा भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर इतरही विक्रम आहेत.
पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीची दमदार कामगिरी
भारताकडून पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. याशिवाय, पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार, चौकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा विराट कोहली एकमेव भारतीय आहे.
विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा
विराटनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तसेच त्यानं शेवटचा एकदिवसीय सामनाही इंग्लंडविरुद्ध जुलै 202 मध्ये खेळलाय. विराट कोहलीनं भारतासाठी 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळला आहे. विराटनं कसोटीत 8 हजार 74 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार 344 धावा आणि टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही. आशिया चषकात विराट कोहली चांगली कामगिरी करून दाखवले, अशी अपेक्षा केली जात आहे.
कधी, कुठं रंगणार भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
विराट कोहलीचा खराब फॉर्म
भारतीय क्रिकेट संघासाठी शतकांवर शतक ठोकणारा विराट कोहलीची बॅट जवळपास तीन वर्षांपासून शांत दिसत आहे. विराटनं कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट सध्या 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे.
हे देखील वाचा-