Ajay Jadeja: भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of India) आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (ZIM vs IND) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलनं (Axar Patel) 24 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. ज्यात दोन निर्धाव षटकांचा समावेश आहे. याआधीही अक्षर पटेलनं भारतीय संघासाठी अनेकदा मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करून दाखवलीय. याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू अजय जाडेजानं अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्याबाबत प्रतिक्रिया दिलीय. 

अजय जाडेजा म्हणाले की, अक्षर पटेलनं गेल्या काही वर्षात त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा केलीय. त्यानं अनेक सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करून दाखवलीय. ज्यामुळं भारतानं अनेक सामने जिंकले आहेत. फलंदाजी करत धावा काढणं आणि संघाला विजय मिळवून देणं, या दोन्ही गोष्टीत फरक आहे. भारताकडं दोन डाव्या हाताचे गोलंदाज आहे, जे डाव्या हातानं फलंदाजी करू शकतात. 

रवींद्र जाडेजाबाबत अजय जाडेजांनी काय म्हटलंय?रविंद्र जाडेजा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणच्या स्पर्धेत त्याच्या आसपास कोणताही खेळाडू नाही.  क्षेत्ररक्षण ही एकमेव गोष्ट आहे जी दोघांना वेगळे करते. जाडेजा अनुभवी आहे. याचबरोबर अक्षर पटेल जाडेजाच्या पाठीच आहे. ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे.

अक्षर पटेलचा फॉर्मविशेष म्हणजे, अक्षर पटेलनं झिम्बाब्वेविरुद्ध चांगली गोलंदाजी केलीय. याआधीही त्यानं फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केलीय. जडेजा आशिया कप 2022 साठी टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. या स्पर्धेत तो भारतासाठी चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

अक्षर पटेलची कारकीर्द
 
क्रिकेटसामनाडावधावाविकेट्ससर्वोत्तम कामगिरीसरासरीइकोनॉमीस्ट्राईक रेट4w5w10w
कसोटी612485396/3812.432.2233.5151
एकदिवसीय42391554503/2431.084.4741.7000
टी-202524571213/927.197.3322.2000

हे देखील वाचा- 

IND vs ZIM, 2nd ODI, Pitch Report : पुन्हा भारत- झिम्बाब्वे आमने सामने, मैदानाची स्थितीसह हवामानाची स्थिती, वाचा सविस्तर

IND vs ZIM, 2nd ODI, Head to Head Record : आज भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय सामना, कोणाचं पारडं जड, कसा आहे आजवरचा इतिहास, वाचा सविस्तर