IND vs WI, 2nd ODI, Harare Sports Club : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात पुन्हा एकदिवसीय सामना रंगणार असून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. उद्या अर्थात 20 ऑगस्ट रोजी हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथील मैदानात खेळवला जात आहे. भारताने एक सामना जिंकला असल्याने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतल्याने आता आणखी एक सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकू शकतो. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया...


आज सामना पार पडणाऱ्या हरारे स्पोर्ट्स क्लब येथील मैदानात वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या सामन्यातही याची प्रचिती आली. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दोन्ही संघातीव वेगवान गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष असेल. 


हवामानाची स्थिती कशी?


हवामानाची माहिती देणाऱ्या Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार सामना होणाऱ्या हरारे स्पोर्ट्स क्लब या ठिकाणचे वातावरण अगदी साफ असणार आहे. वातावरणही दिवसा 28 अंश सेल्सियस तर रात्री 12 अंश सेल्सियसपर्यंत उतरु शकते. वातावरणात दिवसा 28 टक्के रात्री 54 टक्के इतकी आर्द्रता असणार आहे. पावसाची शक्यता अगदी कमी म्हणजेच 1 टक्के इतकी आहे. 


कसे आहेत दोन्ही संघ?



भारतीय संघ - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.


झिम्बाब्वे संघ -  रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.



हे देखील वाचा -