ZIM vs IND: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून केएल राहुलनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाचे म्हणजे, दुसऱ्या एकदिवसीय सामन्या दोन्ही संघानं आपपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केलाय. भारतानं दिपक चहर ऐवजी शार्दुल ठाकूरला संघात संधी दिली आहे. तर, झिम्बाब्वेच्या संघातही दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. 


भारत आणि झिम्बाव्वे (ZIM vs IND) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना हेरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळला जातोयया मालिकेतील पहिला सामना भारतानं 10 विकेट्सनं जिंकला होता. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज दीपक चहरनं महत्वाची भूमिका बजावली होती. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आलीय. तर, शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे.


कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्टला शनिवारी खेळवला जाईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता. 


भारत-झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 64 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 52 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील दोन एकदिवसीय सामने अनिर्णित ठरले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 1983 मध्ये खेळण्यात आला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत आठ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील सात मालिकेत भारतानं विजय मिळवलाय. तर, एक मालिका झिब्बाब्वेनं जिंकली आहे. झिम्बाब्वेने 1996-97 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे आठ विकेट्सनं जिकंला होता. तर, दुसरा सामना रद्द झाला होता. 


भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज. 


झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
 इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, शॉन विल्यम्स, वेस्ली मॅदवेर, सिकंदर रझा, रेगीस चकाब्वा (कर्णधार/विकेटकिपर), रायन बुर्ल, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, व्हिक्टर एनवायुची, तनाका चिवांगा.


हे देखील वाचा-