IND vs NZ T20 Warm-Up Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडयमवर आज खेळला जाणारा सराव सामना पावसामुळं रद्द करण्यात आलाय. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. तर, यापूर्वी अर्धातास दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी दुपारी 1 वाजता मैदानात उतरणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाला. अखेर भारत- न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिलीय.
बीसीसीआयचं ट्वीट-
भारत- न्यूझीलंड सामन्यात पावसाचा गोंधळ
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ब्रिस्बेन येथे पावसाला सुरुवात झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली होती. तसेच 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केला होता. जो स्थानिक वेळेनुसार रात्री 8:46 (भारतीय वेळेनुसार दुपारी 4.16) होता. तसेच पाऊस थांबल्यास हा सामना 5-5 षटकांचा खेळवला जाईल, अशीही माहिती बीसीसीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
ट्वीट-
पहिल्या सराव सामन्यात भारताचा 6 धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.
भारत 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सराव सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. यानंतर भारत टी-20 विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. मागच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्यात पराभवाला समारे जावा लागलं होतं. या सामन्यात भारताला 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-