T20 World Cup 2022: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील सराव सामन्यात पावसानं खोडा घातला. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गबा (Gabba) स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. तर, यापूर्वी अर्धातास म्हणजेच 1 वाजता दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाला असून सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडत आहे आणि त्यामुळे सामना वेळेवर सुरू न होण्याची स्थिती दिसत नाही. यामुळेच बीसीसीआयनं 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केलाय, जो स्थानिक वेळेनुसार 8:46 (भारतीय वेळेनुसार दुपारी 4.16) आहे. तोपर्यंत पाऊस थांबल्यास हा सामना 5-5 षटकांचा खेळवला जाईल.


ट्वीट-






संघ-


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: 
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेले, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, दीपक हुडा, ऋषभ पंत,


टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ:
डेवॉन कॉन्वे, फिन अॅलेन, मार्टिन गप्टील, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मार्क चापमन, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोढी, लॉकी फॉर्ग्युसन, टीम साऊथी, डी. मिचेल. जेम्म नीशम, मिचेल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट.


पहिल्या सराव सामन्यात भारताचा 6 धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.


हे देखील वाचा-