T20 World Cup Records: ऑस्ट्रेलियात आठवा टी-20 विश्वचषक खेळला जातोय. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात झालीय. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकात आतापर्यंत अनेक मोठे विक्रम घडले आहेत. परंतु, या स्पर्धेतील असे काही विक्रम आहेत, ज्यांना मोडणं जवळपास अशक्य मानलं जातंय. या अशक्य वाटणाऱ्या विक्रमांच्या यादीत भारताचा स्टार माजी फलंदाज युवराज सिंहचं (Yuvraj Singh) नाव आहे. 


1) सर्वाधिक षटकार
टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच षटकार- चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो. टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजचा तडाखेबाज खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद आहे. या स्पर्धेत ख्रिस गेलनं आतापर्यंत सर्वाधिक 63 षटकार मारले आहेत. त्याच्या जवळपास एकही खेळाडू नाही. या यादीत युवराज सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहनं टी-20 विश्वचषकात 33 षटकार मारले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर- रोहित शर्मानं प्रत्येकी 31-31 षटकार लगावले आहेत. 


2) सर्वात मोठा विजय
दरम्यान, 2007 मध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या संघानं केनियाविरुद्ध 172 धावांनी विजय मिळवला होता. टी-20 विश्वचषकातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत केनियासमोर 261 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ही टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 2009च्या टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडविरुद्ध 130 धावांनी विजय मिळवला होता. 


3) सर्वात जलद अर्धशतक
भारतानं 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजयात स्टार फलंदाज युवराज सिंहनं महत्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण स्पर्धेत युवराज सिंहनं भारतासाठी सातत्यानं धावा केल्या. या स्पर्धेत युवराज सिंहनं इंग्लंडविरुद्ध सामन्यात अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. याच सामन्यात युवराजनं सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. युवराजनंतर नेदरलँड्सचा फलंदाज स्टीफन मायबर्गनं 2014 च्या विश्वचषकात 17 चेंडूत अर्धशतकीय खेळी केली. 


4) सर्वात मोठा रन चेज
2016 च्या टी-20 विश्वचषकातील गट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा संघ यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चार विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 230 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हा सामना इंग्लंडच्या संघानं दोन विकेट्स राखून जिंकला होता. याशिवाय, 2007 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजनं दिलेलं 208 धावांचं लक्ष्य सहज गाठलं होतं.


5) सर्वोच्च सरासरी
क्रिकेटमधील तुमची सरासरी दाखवते की तुम्ही सातत्याने धावा करत आहात. भारतीय फलंदाज विराट कोहली हा आतापर्यंतच्या T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सरासरी धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 21 सामन्यांत 76.82 च्या सरासरीने 845 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 10 अर्धशतकेही केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी टी-20 विश्वचषकात सरासरीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 54.63 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-