T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत नुकत्याच पार पडलेल्या स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड (SCO vs IRE) सामन्याक आयर्लंडनं सहा गडी राखून स्कॉटलंडला मात दिली आहे. यावेळी आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टीस कॅम्फरनं स्कॉटलंडविरुद्ध अष्टपैलू खेळी करत 2 विकेट्स आणि 72 धावा केल्या, ज्यामुळे सामना आयर्लंडने 6 विकेट्सनी जिंकला. सामन्यात आधी फलंदाजी करत स्कॉटलंडनं 176 धावा केल्या, ज्यांचा पाठलाग करताना आयर्लंडनं 19 ओव्हरमध्ये सामना जिंकला.









सामन्यात आधी स्कॉटलंडनं नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. त्यांचा हा निर्णय फलंदाजांनी बऱ्यापैकी योग्य देखील ठरवला. 176 धावांची एक चांगली धावसंख्या त्यांनी यावेळी उभी केली. यावेळी स्कॉटलंडकडून सलामीवीर मायकल जोन्सने 86 धावांची तगडी खेळी केली तर बेरिंगटननं 37 धावांची खेळी केली. ज्यामुळे 5 गडी गमावत स्कॉटलंडनं 176 रन स्कोरबोर्डवर लावले. ज्यानंतर 177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर 8, 14 अशा धावा करुन तंबूत परतले. लॉर्कन आणि हॅरी यांनी अनुक्रमे 20 आणि 14 धावा करत डाव सावरला, पण दोघेही बाद झाले. त्यानंतर मात्र कर्टीस कॅम्फर (72) आणि जियॉर्ज डॉकरेल (39) यांनी तडाखेबाज खेळी करत सामना संपवला 19 षटकांत 180 रन करत सामना आयर्लंडला जिंकवून दिला. दोघांनी केलेली नाबाद 119 धावांची ही पार्टनरशिप टी20 विश्वचषकातील आयर्लंडसाठीची सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. यावेळी कर्टीस कॅम्फरनं अष्टपैलू खेळी करत 2 विकेट्स आणि 72 धावा केल्या, ज्यामुळे सामनावीराचा पुरस्कार त्यालाच देण्यात आला.


कर्टीस कॅम्फरची तडाखेबाज खेळीची झलक






हे देखील वाचा-