T20 World Cup 2021: T20 विश्वचषकात (T20 WC) भारतीय संघ रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकण्याच्या इराद्याने दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये उतरणार आहे. कारण टीमला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात न्यूझीलंडलाही पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत दोन्ही संघ स्पर्धेतील पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करतील. हा सामना कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील पुढचा प्रवास खूप कठीण असेल. टीम इंडियाच्या पुढील सामन्यात सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील.


रोहित शर्मा 
हिटमॅन रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळेच भारताची सुरुवात खराब झाली आणि संघाला सामना गमवावा लागला. रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम खेळी खेळावी लागेल, जेणेकरून विजयाची नोंद करता येईल.


विराट कोहली
कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 57 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामुळे संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला. या सामन्यात विराट कोहली टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाची जबाबदारी विराट कोहलीवर असेल.


ऋषभ पंत
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पाकिस्तानविरुद्ध 39 धावांची धडाकेबाज खेळी खेळून चर्चेत आला. मात्र, संघाला सामना जिंकता आला नाही. अशा स्थितीत पंतकडून न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळीची अपेक्षा आहे.


जसप्रीत बुमराह 
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने 3 षटकात 22 धावा दिल्या. जसप्रीत बुमराहसाठी पुढील सामन्यात फॉर्ममध्ये परतणे खूप महत्त्वाचे आहे. बुमराहने चांगली कामगिरी केल्यास संघाला विजय मिळवणे सोपे जाईल.


रविंद्र जडेजा
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही पाकिस्तानविरुद्ध बॉल आणि बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. न्यूझीलंडविरुद्ध तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. जर तो चेंडू आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकला तर त्याचा संघासाठी खूप फायदा होईल.


विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंना त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागणार आहे.