ICC T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 फेरीचा आठवा सामना आज (27 ऑक्टोबर) खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड आणि बांगलादेश (England Vs Bangladesh) आमने-सामने आले. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर (Shiekh Zayed Stadium) झालेल्या सामन्यात इंग्लंडने बांग्लादेशला 8 विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशच्या संघाने इंग्लडसमोर केवळ 125 धावंचे लक्ष्य ठेवले. बांग्लादेशकडून मिळालेले लक्ष्य इंग्लंडच्या संघाने फक्त 14.1 षटकातच पूर्ण केले. सुपर-12 फेरीतील इंग्लंडचा हा सलग दुसरा विजय आहे. 


दरम्यान, नाणेफेक जिंकून बांग्लादेशाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशने 20 षटकात 9 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम (29) याने सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय, महमुदुल्लाह (16), नुरुल हसन (16), महेदी हसन (11), लिटन दास (9), मोहम्मद नईम (5), अफिफ हुसैन (5), मुस्तफिझूर रहमान (0) आणि शकीब अल हसन यांनी 4 धावा केल्या. त्याचवेळी नसुम अहमद 9 बॉलमध्ये 19 धावा करून नाबाद राहिला. यात 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडकडून टिमल मिल्सने 3 तर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. याचबरोबर ख्रिस वोकेटलाही एक विकेट्स मिळाली. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात जेसन रॉयने 38 बॉलमध्ये 61 धावा ठोकल्या. जेसन बटलर 18 बॉलमध्ये 18 धावा केल्या. मात्र, शोरफुल इस्लामच्या गोलंदाजीवर जेसन रॉयने आऊट झाला. त्यानंतर नसुम अहमदनेही बटलरला माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या डेव्हिड मलानने 25 बॉलमध्ये 28 आणि जॉनी ब्रेस्टोने 4 बॉलमध्ये 8 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 


एकीकडे इंग्लंडने त्यांच्या मागील सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध दमदार कामगिरी करून दाखवली होती. गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ 14.2 षटकांत अवघ्या 55 धावांत गारद झाला. आदिल रशीद (2 धावांत 4 विकेट्स) आणि मोईन अली (17 धावांत 2 विकेट्स) यांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. यानंतर इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 8.2 षटकात लक्ष्य पूर्ण केले. दुसरीकडे, बांगलादेशने 171 धावा करूनही श्रीलंकेविरुद्धचा मागील सामना गमावला होता.


संघ- 
इंग्लंड:
इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर (विकेटकीपर), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टिमल मिल्स.


बांगलादेशः 
महमुदुल्ला (कर्णधार), मोहम्मद नईम, लिटन दास, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, नुरुल हसन (विकेटकीपर), महेदी हसन, शोरफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद.


संबंधित बातम्या-