IND vs NZ LIVE Updates: पावसामुळं भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द
IND vs NZ Score Live Updates: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा अर्भय संघ (Team India) न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचलाय.
पार्श्वभूमी
IND vs NZ Score Live Updates: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा अर्भय संघ (Team India) न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचलाय. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. टी-20 मालिकेपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेती पहिला सामना आज म्हणजेच 18 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळं दोन्ही संघ नव्यानं सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना आज वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय.
भारतीय संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
हे देखील वाचा-
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -