Team India Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे खेळवला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळत आहे. दरम्यान टीम इंडिया नाणेफेक गमावल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील प्रथम फलंदाजी करत आहे. तर भारतीय संघाचा विचार करता स्टार खेळाडू संजू सॅमसन याचा संघात समावेश असूनही अंतिम 11 मध्ये त्याला जागा मिळालेली नाही. संजूच्या चाहत्यांना अपेक्षा होती की त्याची संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होईल, पण तसे झाले नाही. संजूला पुन्हा एकदा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे.
संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये न दिसल्याने त्याचे चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. चाहत्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. याआधीही संजूची टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात निवड न झाल्याने चाहते संतापलेले दिसले होते. आता पुन्हा एकदा चाहत्यांची नाराजी दिसून येत आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या या निर्णयावर चाहते खूपच नाराज आहेत. संजूने 2015 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तेव्हापासून तो टीम इंडियासाठी केवळ 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याचे चाहते आपापल्या पद्धतीने आपला राग व्यक्त करताना दिसत असून काही खास पोस्ट पाहूया...
कसा आहे भारतीय संघ?
भारतीय संघाचा विचार करता आज सलामीला थेट ऋषभ पंत येत आहे. जोडीला ईशान किशन असणार आहे. शुभमन गिलला संधी मिळेल असं वाटत होतं पण त्याला संधी मिळालेली नाैही. इनफॉर्म सूर्याने विराटची जागा घेतली आहे. तर श्रेयस अय्यर, पांड्या, दीपक आणि वॉशिंग्टन हे मधल्या फळीत असून गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज यांच्यावर सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाचा विचार करता ते विश्वचषकात घेऊन उतरलेल्या संघातील बहुतांश खेळाडू घेऊन उतरले आहेत. कर्णधार म्हणून केनच असून तर ग्लेन हा कमाल फॉर्मात असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय संघ -
ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-
IND vs NZ, Toss Update : भारतानं गमावली नाणेफेक, न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय