India vs New Zealand, Toss Update : न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील हा दुसरा टी20 सामना असून पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. ज्यानंतर आता दुसरा सामना काही वेळात सुरु होणार आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 आंतरराष्ट्री टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना पावसामुळं रद्द झालाय. ज्यानंतर आज पुन्हा एकदा दोघेही आमने-सामने उतरत आहेत.






कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ -
ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंडचा संघ -


फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


सामना होणाऱ्या बे ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे येथे फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या दुसऱ्या भागाच वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.


सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कसं आणि कुठे?


भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 


हे देखील वाचा-