IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. याआधीही न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी खेळाडू मॅट हेन्रीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली त्यामुळे हेन्री आता अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो. पण, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर हेन्री बाहेर पडला तर फायनलच्या एक दिवसआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज असले, पण न्यूझीलंडला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागेल. 






भारताने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया कदाचित अंतिम सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. पण न्यूझीलंडला बदल करावे लागू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान मॅट हेन्रीला दुखापत झाली. हेनरिक क्लासेनचा झेल पकडण्याचा प्रयत्न करताना तो खाली पडला, त्यानंतर हेन्रीच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अपडेट मिळाली नाही.






'हे' भारतीय खेळाडू न्यूझीलंडसाठी ठरणार डोकेदुखी...


विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी आतापर्यंत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली आहे. विराट अंतिम सामन्यातही चमत्कार करू शकतो. हार्दिक पांड्याने उपांत्य फेरीत स्फोटक फलंदाजी केली. तो पुन्हा एकदा भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. न्यूझीलंडविरुद्ध वरुण चक्रवर्तीने घातक कामगिरी केली आहे. त्याने गट सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. चक्रवर्तीचे अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान जवळजवळ निश्चित आहे.


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.


न्यूझीलंड संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : विल यंग, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क. 


हे ही वाचा -


IND vs NZ Final : फायनलची वेळ बदलली? जाणून घ्या दुबईमध्ये किती वाजता रंगणार भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार