Akash Deep Ind vs Nz 3rd Test : भारतीय क्रिकेट संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपल्या आक्रमक शैलीने दुसऱ्या डावातही किवी संघाला बॅकफूटवर ढकलले. त्याची सुरुवात वेगवान गोलंदाज आकाश दीपने केली, जेव्हा त्याने टॉम लॅथमला ड्रीम बॉलवर क्लीन बोल्ड केले.
दुसऱ्या डावात किवी संघासाठी कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण पहिल्याच षटकात कर्णधार टॉम लॅथमला आकाशदीपने दिवसा तारे दाखवले. झाले असे की, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकातच न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. कर्णधार टॉम लॅथमला भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने क्लीन बोल्ड केले. लॅथम अवघ्या 1 धावा करून बाद झाला. लॅथमला गोलंदाजी देताच आकाशने आनंदाने उडी घेतली आणि किवी कर्णधाराला आक्रमक निरोप दिला ज्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या डावात सुरुवातीपासूनच धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा 18 धावांवर, यशस्वी जैस्वाल 30 धावांवर बाद झाला. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी मोहम्मद सिराजला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले, तो गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.
विराट कोहलीही केवळ 4 धावा करून धावबाद झाला. पण, त्यानंतर शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यात 96 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारताचे पुनरागमन झाले. 59 चेंडूत 60 धावांची झटपट खेळी करून पंत बाद झाला. तर गिलने 146 चेंडूंचा सामना केला आणि 90 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला येथे शतक पूर्ण करता आले नसले तरी त्याची खेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती.
पहिल्या डावात 28 धावांची आघाडी
भारतीय संघ पहिल्या डावात 263 धावांवर सर्वबाद झाला होता. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 235 धावांत सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघाला 28 धावांची आघाडी मिळाली आहे. मात्र, आता भारताला या सामन्यात आपली पकड कायम ठेवायची असेल, तर दुसऱ्या डावात किवी संघाच्या फलंदाजांना लवकर आऊट करावे लागेल. त्यामुळे वानखेडेवर चौथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे भारतासाठी कठीण होणार आहे.
हे ही वाचा -