एक्स्प्लोर

IND vs NZ 3rd T20 : भारताने जिंकली नाणेफेक, सूर्यकुमारचा धाडसी निर्णय! अर्शदीप-वरुण OUT, बुमराह-बिश्नोई IN...., पाहा प्लेइंग

India vs New Zealand 3rd T20 Update : रविवार 25 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

India vs New Zealand 3rd T20 Update : रविवार 25 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-0 अशी आघाडीवर असून, आजचा सामना जिंकत टीम इंडिया 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ असणार असून, मालिका जिवंत ठेवण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, “विकेट चांगली दिसतेय आणि नंतर दव पडण्याची शक्यता आहे. आज संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली असून, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली आहे.”

संजू सॅमसनवर असणार खास नजर

तिसऱ्या टी-20 सामन्यात विशेषतः संजू सॅमसनकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शुभमन गिल टी-20 संघातून बाहेर गेल्यानंतर सॅमसन अभिषेक शर्मासोबत सलामीला उतरत आहे. मात्र, या मालिकेतील दोन्ही सामन्यांत तो अपयशी ठरला असून, केवळ 16 धावा करू शकला आहे. दुसरीकडे, नागपूरमध्ये 35 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माकडून पुन्हा एकदा मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल.

सूर्याकुमार यादव फॉर्ममध्ये परतला...

टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवची फॉर्म परतताना दिसत आहे. रायपूरमध्ये त्याने नाबाद 82 धावांची शानदार खेळी साकारली होती. याशिवाय ईशान किशन आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनीही चांगल्या फॉर्मचे संकेत दिले आहेत.

गुवाहाटीतील भारताचा टी-20 रेकॉर्ड

गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर भारताचा टी-20 मधील रेकॉर्ड फारसा प्रभावी राहिलेला नाही. येथे भारताने आतापर्यंत 4 टी-20 सामने खेळले असून, केवळ 1 सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा पहिलाच टी-20 सामना असणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड (Head-to-Head Records)

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 27 सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 16 सामने भारताने, तर 10 सामने न्यूझीलंडने जिंकले असून, 1 सामना टाय झाला. मागील 16 टी-20 सामन्यांत न्यूझीलंडला केवळ 2 वेळाच भारतावर मात करता आली आहे. आकडेवारी भारताच्या बाजूने असली, तरी या मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार असल्याने सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड संघाचा प्लेइंग-11 : डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (डब्ल्यू), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (क), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

भारतीय संघाचा प्लेइंग-11 : संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

हे ही वाचा -

IND vs PAK : टी-20 वर्ल्डकपआधीच भिडणार भारत–पाकिस्तान! जाणून घ्या कधी अन् कुठे रंगणार सामना 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Ind vs Eng T20 : वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण
वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण
बस्स, आता पुरे! सलग पराभवांनी BCCI संतापली, टीम इंडियाच्या अपयशानंतर गौतम गंभीरच्या कामगिरीची होणार समीक्षा
बस्स, आता पुरे! सलग पराभवांनी BCCI संतापली, टीम इंडियाच्या अपयशानंतर गौतम गंभीरच्या कामगिरीची होणार समीक्षा
IND W vs ENG W Test Live Streaming : क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर पहिलीच महिला कसोटी मॅच! JioHotstar की SonyLIV? भारत-इंग्लंड कसोटी कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर पहिलीच महिला कसोटी मॅच! JioHotstar की SonyLIV? भारत-इंग्लंड कसोटी कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z
Shapoor Zadran Passes Away : अलविदा शापूर! जनाजा पाहताच ढसाढसा रडला राशिद खान; अफगाण क्रिकेट शोकसागरात, रवि शास्त्रींची पोस्ट व्हायरल, पाहा सुन्न करणारा VIDEO
अलविदा शापूर! जनाजा पाहताच ढसाढसा रडला राशिद खान; अफगाण क्रिकेट शोकसागरात, रवि शास्त्रींची पोस्ट व्हायरल, पाहा सुन्न करणारा VIDEO

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Embed widget