IND vs NZ 1st Test Kanpur : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूरच्या मैदानात पार पडणाऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाकडून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडत आहे. आधी दमदार फलंदाजीने भारताने 345 धावांचा डोंगर उभारला आहे. ज्यानंतर न्यूझीलंडने देखील चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसाच्या शेवटी एकही गडी न गमावता 129 धावा केल्या आहेत. दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं पूर्ण करत एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम (50) आणि विल यंग (75) खेळत आहेत. 



सामन्यात भारताने नाणेफेक जिकत प्रथम फलंदाजी निवडली. ज्यानंतर सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. ते दोघे बाद होताच शुभमन देखील अर्धशतक (52) झळकावून तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक शतकी भागिदारी रचली.  श्रेयसच्या 105 आणि जाडेजाच्या 50 धावानंतर खालच्या फळीत आश्विनने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  ज्यामुळे भारताने 345 धावांचा डोंगर उभारला. पण प्रतित्यूरात न्यूझीलंडनेही चोख सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाच्य़ा शेवटी न्यूझीलंडने 57 षटकं खेळत एकही गडी न गमावता 129 धावां केल्य़ा आहेत. यावेळी टॉम लॅथम (50) आणि विल यंग (75) क्रिजवर आहेत. भारताच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता न आल्याने तिसऱ्य दिवशी तरी भारत न्यूझीलंडवर आक्रमण करणार का? की न्यूझीलंडचा संघ वरचढ राहणार हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.


श्रेयसनं रचला इतिहास



श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. ज्यानंतर कसोटी पदार्पणासाठी मात्र श्रेयस अय्यरचं नशीब उजळत नव्हता. अखेर 4 वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध अय्यरनं कसोटीमध्ये पदार्पण केलं. पदार्पण करत पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं आहे. पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय ठरला आहे. याआधी लाला अमरनाथ, दीपक शोधन, एजी कृपाल सिंह, अब्बास अली बैग, हनुमंत सिंह, गुंडाप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण आमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा या खेळाडूंनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.


 संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha