Virat kohli On 26/11 Terror Attack: देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईसाठी 26 नोव्हेंबर 2008 हा काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गानं आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. तर, कित्येक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याला आज 13 वर्ष उलटली आहेत. मात्र, आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. आजच्या दिवशी या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहली जाते. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीनंही कूच्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतीवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात दिडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, कित्येकजण जखमी झाले होते. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला म्हणून त्यांची नोंद करण्यात आलीय. या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना दरवर्षी 26 नोव्हेंबरला श्रद्धांजली वाहली जाते. याचदरम्यान, विराट कोहलीनंही या हल्ल्यात मरण पावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहलीय. "आजचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही, या हल्लात प्राण गमावलेल्यांनाही कधीच विसरता येणार नाही. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना आणि कुटुंबियांच्या सदस्याला गमावलं आहे, मी त्यांच्या दुख:त सहभागी आहे", असं विराटनं म्हंटलंय.


विराट कोहली कूवर प्रतिक्रिया- 







या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनाही जीव गमवावा लागला होता. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. 


दरम्यान, दशशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि नरिमन हाऊस ज्यू कम्युनिटी सेंटरवर हल्ला केला होता. नरिमन हाऊस ज्यू कम्युनिटी सेंटर नाव बदलून आता नरिमन लाइट हाऊस असे नामकरण करण्यात आले आहे.