India vs New Zealand 1st Test Day 2 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जात आहे. जेथे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात टीम इंडियाला 10 विकेट्स गमावून केवळ 46 धावा करता आल्या. ज्या खेळपट्टीवर 10 भारतीय खेळाडूंनी मिळून 46 धावा केल्या, तिथे न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने शानदार 91 धावा केल्या. कठीण खेळपट्टीवर कॉनवेने आक्रमक खेळ केली.
डेव्हॉन कॉनवे भारताविरुद्ध सलामीला आहे. तो सुरुवातीपासूनच चांगल्या लयमध्ये होता. प्रथम त्याने टॉम लॅथमसोबत 60 हून अधिक धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने विल यंगच्या साथीने डाव पुढे नेला. 91 धावांची शानदार खेळी खेळून तो माघारी परतला. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. डेव्हन चांगली फलंदाजी करत होता. मात्र व्या षटकात पहिल्या चेंडूवर अश्विनने त्याला बोल्ड केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्र 22 आणि डॅरिल मिशेल 14 धावांसह खेळत होते. भारताकडून आतापर्यंत रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे नाणेफेक न होताच संपवावा लागला होता. दुसऱ्या दिवशी सामना 15 मिनिटे लवकर सुरू झाला आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय फलंदाजी एकदम कोसळली आणि संघाचे 11 खेळाडू 50 धावाही करू शकले नाहीत. खराब फलंदाजीनंतर टीम इंडियाची गोलंदाजीही खराब झाली. एकूणच हा दिवस भारताचा नव्हता.
न्यूझीलंडसाठी कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. लॅथम 15 धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. यानंतर विल यंगसह कॉनवेने डाव सांभाळला. जडेजाच्या चेंडूवर 33 धावा करून यंग बाद झाला. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कॉनवेला आऊट करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. कॉनवे 105 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 91 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
हे ही वाचा -
Ind vs Nz : षटकार सोडा, फक्त तीनच चौकार; 10 पैकी 5 भोपळे पाहून नेटकऱ्यांना झाली रहाणे-पुजाराची आठवण