India vs New Zealand 1st Test : भारतीय क्रिकेट संघ आज बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ज्या प्रकारे खेळला, ते पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले. टीम इंडिया पहिल्या कसोटीत केवळ 46 धावा करून बाद झाली. संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. 






षटकार सोडा, फक्त तीन फलंदाज चौकार मारण्यात यशस्वी झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये एक नाव मोहम्मद सिराजचेही आहे. त्याने चौकारही मारला. दरम्यान, सोशल मीडियावर काही वेगळेच पाहायला मिळत आहे. काही नेटकऱ्यांना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची आठवण झाली, तर काही चाहते फनी मीम्सही बनवत आहेत. 






घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे, त्यामुळे सोशल मीडियावरही इंडिया 46 टॉप ट्रेंडमध्ये दिसला. विशेष म्हणजे आज टीम इंडियाने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रमही मोडला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 2017 मध्ये 49 धावा केल्या होत्या, परंतु टीम इंडियाने कसोटीतही ही छोटी धावसंख्या करण्यात यश मिळवले आहे. हे सध्या सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे.  










पण आज भारतीय संघाच्या फलंदाजांनी केलेले काम. त्यानंतर गोलंदाजांना सामना वाचवणे सोपे जाणार नाही. विशेषत: जेव्हा संघ केवळ 46 धावांवर ऑलआऊट झाला आहे, न्यूझीलंड संघाने कोणतेही नुकसान न करता 50 हून अधिक धावा केल्या आहेत, म्हणजेच विरोधी संघाकडे आघाडी आहे आणि संघाच्या सर्व 10 विकेट अजूनही सुरक्षित आहेत. आता संघ काय करतो हे पाहायचे आहे.






हे ही वाचा -


IND vs NZ 1st Test : टीम इंडियाकडून मोठी चूक, KL राहुलवर संतापला रोहित, व्हिडिओ होतोय व्हायरल