India vs New Zealand 1st Test : बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करणाऱ्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडचा संघ आला, तेव्हा अचानक परिस्थिती बदलली. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांत गडगडली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांनी भरलेला असलेला भारतीय संघ अवघ्या 31.2 षटकांत ऑलआऊट झाला.  


केएल राहुलने केली मोठी चूक 


टीम इंडिया 46 धावांत गारद झाली आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध वेगवान विकेट्सची गरज होती. अशी संधी आली पण केएल राहुलने मोठी चूक केली. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम मोहम्मद सिराजच्या चेंडूवर बाद झाला असता. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपकडे गेला होता, पण पकडण्याऐवजी केएल राहुल चेंडू पासून दूर गेला. केएल राहुलची ही चूक पाहून लाईव्ह मॅचमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर चांगलाच चिडला. 




न्यूझीलंडने घेतली आघाडी 


केएल राहुलच्या या चुकीचा परिणाम म्हणजे न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता भारतीय संघावर आघाडी घेतली आहे. वृत्त लिहिपर्यंत, डेव्हन कॉनवेने अर्धशतक केले होते. मात्र, कुलदीप यादवने 18 व्या षटकात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. कुलदीप यादवने लॅथमला 15 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. तसे पाहता या सामन्यात न्यूझीलंडची पकड खूपच मजबूत झाली आहे. आता टीम इंडिया कशी कमबॅक करते हे पाहायचे आहे.




राहुल फलंदाजीत अपयशी ठरला


केएल राहुलने केवळ झेल सोडला नाही. तर त्याआधी तो फलंदाजीतही अपयशी ठरला. तो खाते न उघडताच बाद झाला. केवळ राहुलच नाही तर सरफराज, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर अश्विनही शून्यावर आऊट झाले. 1999 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाच्या पाच फलंदाजांनी घरच्या मैदानावर खाते उघडले नाही.




हे ही वाचा -


Ind vs Nz 1st Test : 0,0,0,0,0… न्यूझीलंडविरुद्ध भारतीय खेळाडूंनी लावली शून्याची माळ; एक-दोन नाही तर तब्बल 5 खेळाडूंचा 'भोपळा'


Ind vs Nz 1st Test : बांगलादेशविरुद्ध शेर, न्यूझीलंडसमोर ढेर, भारताचा आख्खा संघ 46 धावात आटोपला, 5 जण शून्यावर बाद!