IND vs NZ : भारतीय संघाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 307 धावाचं लक्ष्य देऊनही न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. या मोठ्या पराभवामुळे आगामी एकदिवसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) साठीची तयारीची भारताची सुरुवात खराब झाली आहे. तर या मोठ्या पराभवामागे काही खास कारणं आहेत, त्यातीस मुख्य कारणं पाहूया...
1. लेथम-विल्यमसनची अभेद्य भागिदारी
सर्वात मुख्य कारण म्हटलं तर न्यूझीलंडने केलेली दमदार फलंदाजी भारताची गोलंदाजी खराब झाली असली तरी सुरुवातीला स्वस्तात न्यूझीलंडचे विकेट्स गेले. भारताने सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर मात्र टॉम लेथम आणि केन विल्यमसन जोडीनं तुफान फटकेबाजी केली आणि सहज विजय मिळवला. लेथमने तर तब्बल 19 चौकार मारले. टॉमने 104 चेंडूत तब्बल 19 फोर आणि पाच सिक्स मारत नाबाद 145 धावा ठोकल्या. तर केननं 98 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 94 धावा केल्या. या दोघांनी 221 धावांची अभेद्य भागिदारी करत सामना न्यूझीलंडला 7 गडी राखून जिंकवून दिला.
2. भारताची खराब गोलंदाजी
भारताचा सद्याचा आघाडीचा गोलंदाज अर्शदीप सिंह भारतासाठी सर्वात महागडा ठरला. त्याने 8.1 षटकात 68 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर शार्दुल ठाकूरने 9 षटकांत 63 धावा देत 1 बळी घेतला. शार्दुलची सुरुवात चांगली झाली होती. त्याने एक मेडन ओव्हरही काढली. मात्र यानंतर त्याने 40व्या षटकात 25 धावा दिल्या. उमरानने 10 षटकात 66 धावा दिल्या. त्याने 2 विकेट्स घेतल्या घेतले. पण सर्वच गोलंदाज महाग पडले हे भारताच्या पराभवाचा महत्त्वाचं कारणं ठरलं.
3. भारताची फलंदाजी
आता तुम्ही म्हणाल 306 धावा स्कोरबोर्डवर लावल्यातरी भारताची फलंदाजी हे पराभवाचं कारण कसं असू शकते. तर भारताची फलंदाजी पाहता सुरुवात जितकी दमदार झाली ती पाहला भारत 350 पर्यंतही धावा करु शकला असता, पण धवन-गिल बाद होताच सूर्या पंत हे स्वस्तात बाद झाले. संजूही खास कामगिरी करु शकला नाही. श्रेयसनं 80 धावा केल्या तर सुंदरनेही फटकेबाजी केल्याने भारत किमान 300 चा आकडा पार करु शकला. भारताने आणखी चांगली फलंदाजी केली असती तर आणखी मोठी धावसंख्या उभारु शकला असता.
हे देखील वाचा-