IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने (Shryeas Iyer) न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये खास रेकॉर्ड नावावर केला आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 80 धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं हे 13 वं अर्धशतक आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या आठ डावांमध्ये त्याने सहा अर्धशतकं झळकावली आहेत. ज्यामुळे आज खेळल्या जाणार्‍या सामन्यात श्रेयसने 50 धावा पूर्ण करताच न्यूझीलंडच्या भूमीवर एमएस धोनीचा एक विक्रम मोडीत काढला.


श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या भूमीवर सलग चार वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने एमएस धोनीला मागे सोडले आहे. माजी क्रिकेटपटू धोनीने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावली होती. श्रेयसची आतापर्यंत न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली आहे. या सामन्यासह त्याने आजवर न्यूझीलंडमध्ये चार सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये तो 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. याआधी श्रेयसने न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांत नाबाद 103, 52 आणि 62 धावा केल्या होत्या. आज चौथ्या सामन्यात त्याला 80 धावा करण्यात यश आलं.


श्रेयसची एकदिवसीय कारकिर्द


श्रेयस अय्यर एक युवा पण क्लासिक फलंदाज आहे. पण टीम इंडियात अजून त्याला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. जेव्हा-जेव्हा त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. श्रेयसच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो भारतासाठी आतापर्यंत 34 वनडे खेळला आहे. यादरम्यान श्रेयसने 1379 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतकं आणि 13 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 113 आहे.





भारतानं उभारला 306 धावांचा डोंगर


नाणेफेक गमावल्यावर फलंदाजील आलेल्या भारताने सामन्याची सुरुवातच दमदार पद्धतीनं केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते.  दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनही 72 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होऊ लागले.पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. संजूने श्रेयससोबत डाव सावरला पण 36 धावा करुन संजूही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही 37 धावांची तडाखेबाज खेळी केली 3 सिक्स आणि 3 फोर त्याच्या बॅटमधून आले. पण या सर्वांमध्ये श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेण्यात मोलाची कामगिरी निभावली. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली. आता 307 धावा करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरत आहे.


हे देखील वाचा-