India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात शुभमन गिल (Shubhman Gill) नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. शुमननं तब्बल 208 धावा ठोकत अगदी एकहाती भारताचा डाव सांभाळला आणि संघाला सुस्थितीत नेलं. त्यामुळेच भारताने 349 धावांचा डोंगर उभारला असून आता न्यूझीलंड 50 षटकांत 350 धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताकडून शुभमनशिवाय रोहित शर्माने 34, सूर्यकुमारने 31 आणि हार्दिक पांड्याने 28 धावा केल्या.


नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय


तर सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार फलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्याचा भारताचा डाव होता. जो सलामीवीर शुभमन गिलने सत्यात उतरवत द्वीशतक ठोकत 208 धावा केल्या. शुभमनचं हे पहिलंच द्वीशतक असून सचिन, रोहित, ईशान यांच्यानंतर आणखी एक भारतीय 200 क्लबमध्ये सामिल झाला आहे. भारताने आजही सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु ठेवली. पण 34 धावांवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराटही स्वस्तात तंबूत परतला. ईशानही दुहेरी संख्या गाठू शकला नाही. पण शुभमन मात्र टिकून खेळत होता.सूर्याने 31 तर पांड्याने 28 धावांची साथ शुभमनला दिली. शुभमनने मात्र सर्वाधिक म्हणजेच 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार ठोकत द्वीशतक पूर्ण करत भारताची धावसंख्या 349 पर्यंत पोहोचवली. ज्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ 350 धावाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरत आहे.


शुभमन-रोहितचे खास रेकॉर्ड


सामन्यात शुभमननं द्वीशतक झळकावत अनेक विक्रम नावावर केले. पण त्यापूर्वीच त्याने शतक पूर्ण केलं असतानाच एकदिवसीय सामन्यात 1000 धावांही पूर्ण केल्या. त्याने केवळ 19 डावात हा टप्पा गाठत विराट आणि शिखर या दिग्गजांना मागे टाकलं. या दोघांनी 24 डावात ही कमाल केली होती. पण गिलने 19 डावात 1000 धावा करत हा रेकॉर्ड मोडला आहे. दुसरीकडे रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या 74 डावांत 124 षटकार ठोकले आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याला मागे टाकलं आहे. धोनी भारतासाठी 123 षटकार ठोकले होते.  




 


हे देखील वाचा-