IND vs NED: पाकिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघ नेदरलँड्सशी भिडणार; कधी, कुठं पाहणार सामना?
India vs Netherlands, ICC T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ उद्या (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध (IND vs NED) दोन हात करेल.
India vs Netherlands, ICC T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ उद्या (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध (IND vs NED) दोन हात करेल. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग दुसरा विजय मिळवण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडं भारतीय संघाला कडवी झुंज देऊन अवस्थ करण्याचा नेदरलँड्सचा प्रयत्न असेल.
नेदरलँड्सनं गेल्या चारपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. ज्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव झालाय, त्या सामन्यात त्यांनी विरोधी संघाला कडवी झुंज दिली आहे. नेदरलँड्सचा श्रीलंकेविरुद्ध 16 धावांनी तर, बांग्लादेशकडून अवघ्या नऊ धावांनी पराभव झाला. अशा परिस्थितीत नेदरलँड्सला हलक्यात घेणे भारतीय संघाला महागात पडू शकतं.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना गुरूवारी (27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
सुपर-12 'ब' गट
बांगलादेश गट 'ब' मध्ये पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश संघानं पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला होता. तर, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला होता. तर, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, झिम्बाब्वे चौथ्या, पाकिस्तान पाचव्या आणि नेदरलँड्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल.
नेदरलँड्सचा संघ:
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगटेन , स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, ब्रॅंडन ग्लोव्हर.
हे देखील वाचा-